एका वाक्यात उत्तरे लिहा
1)कोणता काळ हा प्रबोधन युग म्हणून ओळखला जातो?
योग्य उत्तर: युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सणाची तेरावे ते सोळावे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते.
2) या कालखंडात कोण कोणत्या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला?
योग्य उत्तर: या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला.
3) प्रबोधन युगात युरोपातील कोण कोणत्या परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले?
योग्य उत्तर: प्रबोधन युगाचा युरोपातील कला,, स्थापत्य तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले.
4) प्रबोधन काळात कोणाला चालना मिळाली?
योग्य उत्तर: प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली.
5) माणसाचा माणसाकडे पाहण्याचा काय बदलला?
योग्य उत्तर: माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.
6) लिओनार्दो द विंची हे कोण कोणत्या शास्त्र व कलांमध्ये पारंगत होते?
योग्य उत्तर: : लिओनार्दो द विंची हे अनेक शास्त्रे व कलांमध्ये पारंगत होते.
शिल्पकला, स्थापत्य कला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र यासारख्या अनेक विविध विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते.
7)लिओनार्दो द विंची यांच्या कोण कोणत्या चित्राकृती अजरामर ठरल्या?
योग्य उत्तर: लिओनार्दो द विंची यांच्या ‘मोनालीसा’ व ‘ द लास्ट सफर’ या चित्राकृती अजरामर ठरल्या
8)आपल्याला कोण कोणत्या क्षेत्रात प्रबोधन चळवळीचा अविष्कार पाहायला मिळतो?
योग्य उत्तर:: ज्ञान, विज्ञान तसेच विविध कलांच्या क्षेत्रात आपल्याला प्रबोधन चळवळीचा अविष्कार पहायला मिळतो.
9) प्रबोधन कालीन कला व साहित्यामधून कशाचे चित्रण होऊ लागले?
योग्य उत्तर:: प्रबोधन कालीन कला व साहित्यामधून मानवी भावभावना आणि संवेदना चे चित्रं होऊ लागले.
10) छपाई अंतराच्या शोधामुळे समाजात सर्वांत पर्यंत काय पोहोचू खुश्कीचेलागले?
योग्य उत्तर:: छपाई यंत्राचा शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वान पर्यंत पोहोचू लागले
11)धर्मसुधारणा चळवळ म्हणजे काय?
योग्य उत्तर:: धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत .या विरोधात जी चळवळ सुरू होती तिला धर्मसुधारणा चळवळ असे म्हणतात.
12) धर्मसुधारणा चळवळीचे फायदे कोणते?
योग्य उत्तर: या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य या तत्वांना महत्त्व प्राप्त झाले.
13) कॉन्स्टँटिनोपल या शहरातून कोण कोणत्या खंडांना जोडणारे खुश्कीचे व्यापारी मार्ग जात?
योग्य उत्तर:: कॉन्स्टँटिनोपल या शहरातून आशिया व युरोप खंडांना जोडणारे खुश्कीचे व्यापारी मार्ग जात.
14) युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यकता वाटू का लागले?
योग्य उत्तर: तुर्कांनी युरोप आणि आशिया यांना जोडणारा व्यापारी मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशिया कडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले.
15) यातूनच भौगोलिक शोधाचे काय सुरू झाले?
योग्य उत्तर: यातूनच भौगोलिक शोधाचे नवे पर्व सुरू झाले .
16)प्रबोधन काळात झालेल्या बदला बदलामुळे युरोपमध्ये काय सुरू झाले?
योग्य उत्तर प्रबोधन काळात झालेल्या बदलामुळे युरोपची मध्ये योगा कडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली.आणि याच काळामध्ये युरोपमध्ये वैचारिक क्रांती घडून आली.
17 ) वैचारिक क्रांती म्हणजे काय?
योग्य उत्तर:प्रस्थापित रूढी व परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले या संपूर्ण बदलांना ‘वैचारिक क्रांती’ असे संबोधले जाते.
18) वैचारिक क्रांती तून युरोपमध्ये कोणत्या क्षेत्रांमध्ये संशोधनाला चालना मिळाली?
योग्य उत्तर:वैचारिक क्रांतीतून युरोप मध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला चालना मिळाली.
19) आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात युरोपमध्ये काय घडून आले?
योग्य उत्तर:आधुनिक कालखंडाच्या सुरवातीच्या टप्प्यात युरोपमध्ये अनेक राजकीय स्थित्यंतरे घडून आली
20)क्रांती युग म्हणजे काय?
योग्य उत्तर: 18व्या तसेच19व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांतीयुग म्हणून ओळखला जातो .
21)अठराव्या व एकोणिसाव्या शतकात इंग्लंड मध्ये कशाचा विकास झाला?
योग्य उत्तर: अठराव्या व एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला.आणि कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला.
22) इसवी सन 1689 या वेळी इंग्लंड मध्ये काय झाले?
योग्य उत्तर:: इसवी सन सोळाशे 89 च्या बिल ऑफ राइट्समुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या.
23) युरोपीय देशांनी आपले लक्ष अमेरिका खंडाकडे का वळले?
योग्य उत्तर अमेरिका हा खंड शोधल्या मुळे सर्व युरोपीय देशांचे लक्ष या खंडावर वळले.
24)अमेरिका खंडावर कोणत्या देशांनी वसाहती स्थापन केल्या?
योग्य उत्तर: साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या.
25)इंग्लंडने अमेरिका खंडात किती वसाहती स्थापन केल्या आणि कुठे केल्या?
योग्य उत्तर: इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या
26)अमेरिकन वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय जनतेने कशाला विरोध केला?
योग्य उत्तर: सुरुवातीस इंग्लंडचे या प्रसाद तीवर नाममात्र वर्चस्व होते परंतु पुढील काळात इंग्रजांच्या पार्लिमेंट ने अमेरिकन वसाहतीवर जाचक बंधने व करण्यास सुरुवात केली म्हणून अमेरिकन तसा तिथे स्वातंत्र्यप्रिय जनतेने याला विरोध केला.
27) इंग्लंड ने वसाहती विरोधात युद्ध का पुकारले?
योग्य उत्तर इंग्लंड ने वसाहतींना दडपण्यासाठी वसाहती विरोधात युद्ध पुकारले.
28) अमेरिकन वसाहतींनी कोणाच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला
योग्य उत्तर: अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला.
29) अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध म्हणजे काय?
योग्य उत्तर अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली संघटित करून प्रतिकार केला अखेरीस वसाहतींच्या सैन्याचा विजय झाला ही घटना अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध म्हणून ओळखली जाते
30) अमेरिका हा देश कसा अस्तित्वात आला?
योग्य उत्तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासन पद्धती लिखित राज्यघटना असणारा व लोकशाही व्यवस्था असलेला नवा देश अस्तित्वात आला
रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1) ----------- ऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला.
योग्य उत्तर: धर्मा ऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला.
2 )---------------------हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते
योग्य उत्तर: लियनार्दो- द- विंची हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते.
3) लिओनार्दो द विंची हे-------------------- म्हणून जगप्रसिद्ध ठरले
योग्य उत्तर: लियनार्दो दा विंची हे चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरले.
4) लोकांना समजेल अशा-------------- भाषांमधून साहित्य निर्माण होऊ लागले.
योग्य उत्तर:: लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्मा ण होऊ लागले.
5) इसवी सन 1450 च्या सुमारास जर्मनीच्या----------------------- याने छपाई यंत्राचा शोध लावला.
योग्य उत्तर: इसवीसन 1450 च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला.
6) लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन---------------- कर्मकांडांचे स्तोम माजवत असत
योग्य उत्तर: लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडांचे स्तोम माजवत असत
7) इसवी सन 1453 मध्ये--------------- बायझन्टाइन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल (इस्तंबूल) जिंकून घेतले
योग्य उत्तर:: इसवीसन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझन्टाइन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल (इस्तंबूल) जिंकून घेतले
8) पूर्वीचे-------- व-------- यातून समाज बाहेर पडू लागला.
योग्य उत्तर:पूर्वीचे अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला.
9 ) इंग्लंड मध्ये----------- सार्वभौमत्व प्रस्थापित झाले.
योग्य उत्तर इंग्लंड मध्ये पार्लिमेंटचे सार्वभोमत्व प्रस्थापित झाले
10) इसवी सण 889 मध्ये फ्रान्समधील जनतेने तेथील------------ अशा--------------- राजेशाही आणि------------ विरोधात उठाव केला
योग्य उत्तर:इसवी सन 1889 मध्ये फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाही विरोधात उठाव केला
11) फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला-------,-------,-------- या मूल्यांची देणगी दिली
योग्य उत्तर:फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य ,समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिली
12) प्रजासत्ताकाची स्थापना केली ही घटना--------------------- ओळखली जाते
उत्तर: प्रजासत्ताकाची स्थापना केली ही घटना फ्रेंच राज्यक्रांती ओळखली जाते

Good Post-Srweb
ReplyDelete